Share

Sanjay Raut | उद्धव ठाकरे म्हणाले मध्यावधी निवडणुकीच्या कामाला लागा अन् संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut | मुंबई : काही दिवसांपुर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असून निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेश दिला होता. त्यामुळे मध्यावधी निवडणूकांच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

महाराष्ट्राचं राजकारण इतकं असिथर झालं आहे की, मध्यावधीची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे, त्यामुळे, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार आहेत, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं आहे.

कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत. इतर लोक पक्षाला सोडून गेले. त्यापेक्षा कीर्तिकरांनी पक्ष सोडला याचं दु:ख अधिक आहे, असं सांगतानाच आता आम्ही या विषयावर अधिक बोलणार नाही. अमोल कीर्तिकरांसारखे तरुण आमच्यासोबत आहे. या तरुणांसोबतच शिवसेनेचा पुढचा प्रवाह जाणार आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : काही दिवसांपुर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना राज्यात मध्यावधी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now