मुंबई: राज्यातील राजकीय अस्थिरता, शिवसेनेशी बंडखोरी यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तिखट शब्दांत प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. कधी माध्यमांशी बोलताना तर कधी सामना अग्रलेखातून ते प्रत्येक घडामोडीवर प्रत्युत्तर देत आहे. मात्र कालच (२७ जून) त्यांना इडीकडून जमीन घोटाळयाप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. तर आज त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत चर्चांना वाट करून दिली आहे.
“जहालत एक किस्म कि मौत है, और जाहिल लोग चलती फिरती लाशे है…”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. यापूर्वीही त्यांनी सेनेशी बंड करणाऱ्या आमदारांवर निशाणा साधत टीका केली होती. आज त्यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा अप्रत्यक्ष बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 28, 2022
दरम्यान जमीन घोटाळाप्रकरणी त्यांना संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना आज २८ जून रोजी चौकशीला जावे लागणार आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ पुनर्विकास घोटाळाप्रकरणी सदरील नोटीस देण्यात आली आहे. २००६ साली जॉईंट व्हेंचर अंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. सदरील प्रकल्प २००८ साली सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे समोर आले. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान असून वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Aditya Thackeray : मुंबईत इमारत कोसळून मोठी दुर्घटना, आदित्य ठाकरेंनी घेतली घटनास्थळी धाव
- Sumit Khambekar : अजित पवार कोरोना पाॅझिटिव्ह; ‘मनसे’ने म्हटले, “मुख्यमंत्री साहेबांचा सल्ला घ्या कारण..”
- Mumbai : धक्कादायक! मुंबईत चार मजली इमारत कोसळली, २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकले
- Sanjay Raut : “…पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारेल का?” ; संजय राऊतांचा बंडखोरांवर निशाणा
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<