एक दिवस सगळ्यांनाच पकोडे तळण्याची वेळ येईल : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : . काश्मीरमध्ये रोज जवान हुतात्मा होत आहेत. आणि आपण इथं पकोड्याबाबत बोलत आहोत. ही बाब गंभीरपणे न घेतल्यास एक दिवस सगळ्यांनाच दिल्लीत पकोडे तळण्याची वेळ येईल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी पकोडे विकून बेरोजगारीवर मात करावी असे सांगितले होते. नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला. आता भाजप सोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनेचे नेते संजय राऊत सरकारवर टीका करत. काश्मीरमध्ये रोज जवान हुतात्मा होत आहेत. अन् आपण इथं पकोड्याबाबत बोलत आहोत. ही बाब गंभीरपणे न घेतल्यास एक दिवस सगळ्यांनाच दिल्लीत पकोडे तळण्याची वेळ येईल, असा टोला त्यांनी लगावला. काश्मीरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी एका रूग्णालयावर हल्ला करून तेथून एका कुख्यात दहशतवाद्याची सुटका करून पलायन केले. २०१४ साली अटक केलेला हा दहशतवादी पाकिस्तानातील होता. यामध्ये दोन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला होता. हाच मुद्दा उचलत राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.