fbpx

आता ‘या’ बड्या नेत्याची जीवनकथा संजय राऊत आणणार रुपेरी पडद्यावर

टीम महाराष्ट्र देशा: माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेले नेते जॉर्ज फर्नाडीस यांची जीवनकथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. फर्नाडीस यांच्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

कामगारांच्या हक्कासाठी लढणारे नेते म्हणून जॉर्ज फर्नाडीस यांना ओळखल जात. त्यांनी संरक्षण, रेल्वे, दूरसंचार आणि उद्योगमंत्री अशी महत्वाची पदे सांभाळली आहेत. ७० – ८० च्या दशकात त्यांनी केलेल्या राजकारण आणि समाजकारण आपल्याला प्रेरणा देत असल्याच राऊत यांनी म्हंटल आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आपल्यावर सर्वाधिक प्रभाव हा जॉर्ज फर्नाडीस यांचा असल्याचही त्यांनी सांगितले. दरम्यान,  हा सिनेमा २०२१ मध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.