संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार आहेत; पाटलांचा खोचक टोला

chandrkant dada

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल असे म्हणत राज्यभर खळबळ उडवून दिली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘चंद्रकांत दादा हे आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका.चमत्कार होणार आहे.चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे.

चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना समजू शकतो. मात्र मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला अजून २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. कारण उद्धवजींच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार पुढील २५ वर्षे कायम राहणार आहे. त्यामुळे त्यांनी मनाची तयारी ठेवावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. तसेच ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना अशी ऑफर आली असं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल.’ असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार आहेत अशी मला माहिती मिळाली आहे. तसेच संजय राऊत यांना फार कोणी महत्व देत नाही. असा टोला देखील आज पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या