#महाराष्ट्र_बचाओ : संजय राऊतांनी भाजपाच्या निदर्शनांची खिल्ली उडवली, म्हणाले…

raut

मुंबई : ठाकरे सरकारविरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.

तर या आंदोलनचे पडसाद राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील उमटताना दिसले. औरंगाबाद , नागपूर, चंद्रपूर येथे भाजप समर्थकांनी आपल्या अंगणात उभे राहून सरकारच्या निष्क्रीयते विरोधात आंदोलन केले. हातात वेगवेगळ्या आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले.

तसेच याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाच्या या निदर्शनांची खिल्ली उडवली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आज तर आकाशात कावळेही दिसले नाहीत. काळे. त्यांचं ते काळं आंदोलन आहे ना? बहुतेक आज कावळे घरट्यांमध्ये बसलेत. त्यांच्यावर कुठला ठपका नको म्हणून, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

दरम्यान, ‘मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा यांनी काळ्या चड्ड्या, काळे बनियन घालून आंदोलन केलं असतं तर महाराष्ट्रानं त्यांची पाठ थोपटली असती, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या बातम्या 

भाजपने खालच्या पातळीचे राजकारण करून जागतिक विक्रम केला : आदित्य ठाकरे

भाजपाची आजची काळी कृती महाराष्ट्र कधीही विसरणार नाही : बाळासाहेब थोरात