मुंबई: बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची करायची आणि हे असले भलतेच उद्योग करून महाराष्ट्रद्रोहयांचे हात बळकट करायचे. “महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करू,” असे शिवसेनेपैकी कोणी बोलले तर “यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे हो ऽऽ,” म्हणून बोभाटा करायचा. बेळगावातील मराठी अत्याचारांवरही आता यांची तोडे बंद पडतील. शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढे दिले. भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.
भारतीय जनता पक्षाची अलीकडच्या काळातील वक्तव्ये जनतेला गोंधळात टाकणारी आहेत. एका बाजूला चंद्रकांत पाटलांनी सांगायचे, शिवसेनेत जे सुरू आहे त्याच्याशी आपला संबंध नाही. तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्याच वेळी रावसाहेब दानवे यांनी अंगास हळद लावून व मुडावळ्या बांधून बोलायचे, आता फार तर एक-दोन दिवसच विरोधी पक्षात बसू, दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येईल. शिवसेनेतील बंडाशी संबंध नाही असे म्हणायचे व दुसया बाजूला दोन दिवसांत भाजपचे सरकार येईल, असे बोलायचे. त्यामुळे खरे काय? असा सवाल संजय राउत यांनी भाजपला केला आहे.
मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन श्री. शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली, गुवाहाटीमधील आमदार मंडळी शहा यांच्याशी झालेल्या संवादानंतर इतकी खूश झाली की, त्यांनी आपला आसाममधील मुक्काम आणखी सात दिवस वाढविला आहे. बडखोर आमदारांना जे करायचे त्यासाठी ते मुखत्यार आहेत. असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा पण, शरद पवारांनी थांबवलं?
- Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
- Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
- Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर
- Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<