भाजपच्या कर्नाटकातील खेळीचे पडसाद राज्यभर उमटतील – संजय राऊत

बंगळुरू : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

दरम्यान राज्यपालांच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून तर टीका होतच आहे पण आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनी देखील निशाना साधला आहे.कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्तेचा वापर करत आहे. यापूर्वी गोवा व मणिपूरमध्ये जे केले तेच कर्नाटकमध्ये होईल. मात्र, याचे पडसाद देशभरात उमटतील, असे स्पष्ट करत, 2019 मध्ये भाजपची केंद्रातदेखील स्वबळावर सत्ता येणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

‘कर्नाटकात भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा कॉंग्रेस आघाडीकडे आहे. मात्र, कर्नाटकचे राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते कॉंग्रेसला सत्तेत येऊ देणार नाहीत,” असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Shivjal