fbpx

वायफळ बोलण्यापेक्षा मौनात ताकद असते,मोदींच्या बचावासाठी शिवसेना मैदानात

टीम महाराष्ट्र देशा : काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पहिली पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. मोदींनी साधलेल्या मौनावर चौफेर टीका होत असताना भाजपचा मित्रपक्ष शिवसेना मोदींच्या बचावासाठी धावून आला आहे.

मौन स्फोटक असते. वायफळ बोलण्यापेक्षा मौनात ताकद असते, अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेचे तोंडभरून कौतुक केले आहे.मोदींना जे काही सांगायचे आहे ते त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या कामतून सांगितले आहे, असं म्हणतभाजप आणि मोदींच्या पाच वर्षातील कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

कालच्या पत्रकार परिषदेतील मोदींच्या मौनानंतर विरोधकांनी ‘असा’ साधला निशाणा