खडसेंच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊत म्हणतात…

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी काल पक्षातील नेत्यांना चांगलाचं घरचा आहेर दिला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली असती तर आज भाजपवर ही वेळ आली नसती, असा टोला खडसेंनी लगावला आहे.

खडसेंच्या या परखड वक्तव्यानंतर खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी सूचक विधान केले आहे. खडसे हे नेहमीचं आमच्या संपर्कात होते, असे राऊत म्हणाले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पुढे नेण्यास केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं वचन त्यांनी दिलं. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला त्यांनी यावं ही अपेक्षा असल्याचं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान अनेक दिवसांच्या संघर्षानंतर राज्यात आता महाविकासआघाडीचे सरकार आले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा देत उद्धव ठाकरेंना नेतृत्व म्हणून स्विकारले आहे. आज शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होत आहे. यावेळी राज्यातील आणि देशातील अनेक राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

Loading...