fbpx

कोणीही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो; संजय राऊत यांचा मोदींना टोला

Sanjay-Raut

मुंबई – २०१९ ला जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर मी पंतप्रधान होऊ शकतो असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केलं होत. राहुल गांधी यांच्या या वक्त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

दरम्यान यावरून आता शिवसेनेने राहुल गांधी यांची बाजू घेत भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींच्या राहुल गांधी विरोधातील वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर कोणत्याही सेवक देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे राऊत यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला होता. यावर ‘हो नक्कीच’ असे उत्तर राहुल गांधींनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मोदींनी प्रचारसभेत घेतला होता. कर्नाटका मध्ये कोणीतरी मी पंतप्रधान होणार म्हणून महत्वाची घोषणा केली. स्वत:लाच अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा नाही का ? असा सवाल पंतप्रधान मोदींनी एका प्रचारसभेत विचारला होता.