‘आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र केलं’

‘आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र केलं’

Sanjay Raut

नाशिक: राज्यात निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्षांची आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणुका जवळ आल्या की आरोप प्रत्यारोपांच्या फायरी सुरू होऊन जातात. राज्यात महावीकस आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात शाब्दिक चकमकी चालूच असतात. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतल्यावर त्यांच्यावर विरोधकांकडून चांगलीच टीका होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यावेळी भाजप तसेच मोदी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. १९४७ मध्ये ‘चलेजाव’ची चळवळ झाली म्हणून ब्रिटिश सरकार भारतातून पळून गेले. तसेच जनता रस्त्यावर आली तर कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री हे जनतेने पहिले नसते. त्यामुळे मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचे संजय राऊत म्हणाले.

राज्यातील राजकारणावर भाष्य करताना त्यांनी अप्रत्यक्ष भाजप पक्षाचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र करत भगवा फडकावला, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. त्याच सोबत त्यांनी भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना देखील टोला लगावला आहे, चंद्रकांत पाटलांना शोक झाला असेल तर शोकसभा आयोजित करू, असा टोमणा संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: