Share

Ashish Shelar | संजय राऊतांनी शिक्षणासाठी रामभाऊ म्हाळगीत जावे ; आशिष शेलारांचा टोला

Ashish Shelar | मुंबई : भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा समस्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी उद्या १७ डिसेंबरला महामोर्चा काढणार आहे. तर भाजप देखील महाविकास आघाडी विरोधात उद्या ‘माफी मागो’ आंदोलन करणार आहे. आशिष शेलारांनी ही घोषणा केली आहे.यावेळी त्यांनी संजय राऊतांवर घणाघात केला.

“संजय राऊत अहंकाराच्या पोटी अधोगतीला गेलेत. मुंबई प्रांतामध्ये मध्यप्रदेशचा महू भाग कधीपासून होता. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे झाला. संजय राऊत सरडा आणि विंचवाचे मेंदू तुमचे झाले आहेत का?. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म स्थानाबाबत वाद निर्माण केला आहे. ही अफगाणी सुपारी तुम्ही का घेतली, हा आमचा प्रश्न आहे. स्वत:ला कळते ते शहाणपण या अहंकारामधून बाहेर या, नसेल तर रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत शिकवण लावा,” असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

भाजप संजय राऊत यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाली आहे. हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मुंबई भाजपा तर्फे उद्या संपूर्ण मुंबईमध्ये ‘माफी मांगो’ आंदोलन करणार असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

“डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दोन पुस्तके संजय राऊत यांना पाठवले आहे. संजय राऊत यांनी संपूर्ण अभ्यास करावा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?, यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुरु आहे. हे सर्व जाणीवपूर्वक सुरु आहे,” असे शेलार म्हणाले.

बाबासाहेबांचा विचार असाच संपवता येणार नाही. त्यावर प्रश्न निर्माण करता येणार नाहीत. संजय राऊत यांना माफी मागावी लागेल, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्याविरोधात भाजप उद्या माफी मागो आंदोलन करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Ashish Shelar | मुंबई : भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now