दवाखान्यात असणाऱ्या संजय राऊत यांचा अपमान करणे निलेश राणेंना शोभते का ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा चेहरा म्हणून काम करणारे शिवसेना खासदार रुग्णालयात आहेत. कामाचा वाढता तणाव, पत्रकार परिषद, सामनातील अग्रलेख, यामुळे दैनंदिन जीवनात अडथळे येत होते. काल दुपारी राऊत यांना छातीत दुखण्याच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र  सध्या भाजपवासी झालेले माजी खासदार नितेश राणे यांनी राऊत यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत खालच्या पातळीवर राणे यांच्यावर टीका केली आहे. ”संज्याला काही झालेलं नाही. शिवसैनिक फटकावतील आणि अती हुशारी दाखवून तोंडावर आपटला म्हणून तो मुद्दामून आडवा झालाय. स्वतः चालत गेलाय हॉस्पिटलमध्ये आणि काही तासातच सगळी ऑपरेशन करून झाली ह्याच्यावर. लोक मूर्ख नाही संज्या. ” असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राणे कुटुंबियातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. परंतु राज्यातील एक माजी खासदाराच एका खासदाराचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान करतो हे निलेश राणेंना शोभत नाही. तसेच वैयक्तिक वादासाठी कोणत्याही खासदाराचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपमान करून राणेंनी राज्यातील राजकारणाच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम केले आहे. यापूर्वीही नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शिवसेनेची बदनामी करण्याची एकही संधी सोडली नव्हती. आज सकाळीच निलेश राणेंचे भाऊ नितेश राणे यांनी देखील शिवसेनेवर टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या :