‘संजय राऊत, निर्लज्जपणालाही मर्यादा असतात’ ; भातखळकरांचा घणाघात

sanjay raut

मुंबई : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात किती रुग्णांनी प्राण गमावले? असा प्रश्न मंगळवारी राज्यसभेत सरकारला विचारण्यात आला होता. त्यावर, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -19 रूग्णांचा मृत्यू झाला का? या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते कि, ‘ केंद्र सरकारचे हे उत्तर ऐकून धक्का बसला. सरकारने सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावला नसल्याची केंद्राची माहिती ऐकून आपल्याला धक्का बसल्याचं संजय राऊत यांनी म्हटल्यानंतर आता अतुल भातखळकर यांनी त्यावर टीका करत संजय राऊतांना खोचक सल्ला दिला आहे. ‘मे महिन्यात ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं होतं की राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही. केंद्राचे अहवाल राज्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनतात. केंद्राने ठाकरे सरकारच्या माहितीच्या आधारे तसाच अहवाल बनवला. या अहवालाचा म्हणे संजय राऊत यांना धक्का बसला’, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

दरम्यान, या आकडेवारीनंतर केंद्र सरकारवर खटला दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरून देखील अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे. ‘अहो संजय राऊत, निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा. मग असे धक्के बसणार नाहीत. राऊत आता लोकांना केंद्र सरकारविरुद्ध केस दाखल करायला सांगत आहेत. मग आता तोच न्याय स्वत:लाही लावा’, असं भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तर दुसरीकडे भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत व महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्र सरकारवर खटला भरला पाहिजे. तर महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलेय. मग राज्यस रकारवर ही राऊत हे खटला भरणार आहेत का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP