Share

Sanjay Raut | “सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे, काही बरं वाईट…”; संजय राऊतांचे गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Disputes) आणि नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेलं आहेत.

सरकार माझ्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सूडबुद्धीने कारवाई करत सुरक्षा काढली जात असून, सत्ताधारी नेत्यांना दिली जात असल्याचं संजय राऊत म्हणालेत. आमच्यावर हल्ले व्हावेत, दवाबाखाली राहावं यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. पण तसं काही होणार नाही, असं ते म्हणाले.

राऊत म्हणाले, “मला पोलीस, गुप्तचर यंत्रणांकडूनही यासंबंधी कळलं आहे. गेल्या २५ ते ३० वर्षं, मुंबईच्या दंगलीपासून सुरक्षाव्यवस्था होती. पण या सरकारने सर्व सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही पुन्हा सुरक्षा मागितलेली नाही, आणि मागणारही नाही”. कोणत्या नियमाने आणि भूमिकेतून ही सुरक्षा काढण्यात आली?, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

“मी ‘सामना’ कार्यालय, शिवसेना भवनात बसलेलो असताना तसंच जेलमध्ये जाताना किंवा घरी येताना याच कारणामुळे पोलिसांची सुरक्षा दिली जात होती. काहीतरी होऊ शकतं याची माहिती असतानाही सरकारने सुरक्षा काढली आहे. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. पण काही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही,” असं वक्तव्य राऊतांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Disputes) आणि नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics