मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आजच्या आग्रलेखात विरोधकांवर कडाडून टीका केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचे समर्थनही संजय राऊत यांनी केले. त्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार इतके विचित्र निर्णय घेत आहे की त्याच समर्थन करताना हल्ली संजय राऊत यांची विधान व वास्तव यांच्यात काही संबंध दिसत नाही. अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
#महाविकासआघाडी सरकार इतके विचित्र निर्णय घेत आहे की त्याच समर्थन करताना हल्ली @rautsanjay61 यांची विधान व वास्तव यांच्यात काही संबंध दिसत नाही. त्यांचा दावा शेतकरी हितासाठी वाईन विक्रीचा निर्णय
गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यावर संकट आली पण सरनाईक दंड माफ करण्यात मग्न असणाऱ्या— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 29, 2022
याबाबत केशवर उपाध्ये यांनी ट्विट केले आहे. उपाध्ये ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाविकास आघाडी सरकार इतके विचित्र निर्णय घेत आहे की त्याच समर्थन करताना हल्ली संजय राऊत यांची विधान व वास्तव यांच्यात काही संबंध दिसत नाही. त्यांचा दावा शेतकरी हितासाठी वाईन विक्रीचा निर्णय गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यावर संकट आली पण सरनाईक दंड माफ करण्यात मग्न असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांच दुःख दिसल नाही.’
‘मुखमंत्री तर त्यांनीच शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलेले वचन विसरले. त्यामुळे राऊत शेतकरी हितासाठी सांगतील आणि जनता विश्वास ठेवेल एवढी दुधखुळी नाही. या निर्णयामागे नेमक कोणत ‘गणित’ आहे याचा उलगडा होईलच.’ असे केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
संजय राऊतांनी आजच्या आग्रलेखामध्ये लिहीले आहे की, ‘सरकारने ‘वाईन’ विक्रीसाठी सुपर मार्केट खुले केले म्हणून महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ होईल असे बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. महाराष्ट्राच्या संस्कारांचा अपमान आहे. दारू म्हणजे औषध आहे. “थोडी थोडी पिया करो” असा मंत्र चार दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंग यांनीच दिला आहे, त्यावर हे झिंगाडे काय बोलणार आहेत?’, असा खोचक सवाल राऊत यांनी केला आहे.
ते पुढे लिहीतात, ‘सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार हा निर्णय महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करणारा आहे, असे बोंबलणे म्हणजे स्वतःच्या उरल्यासुरल्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखे आहे. सरकारने हा निर्णय घेतला तो शेतकरी, फलोत्पादन करणाऱ्या कष्टकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून, राज्यातील दाक्ष बागायतदार, वाईन उद्योगास चालना मिळावी म्हणून. त्यात नाक मुरडावे असे काय आहे?’, असेही राऊतांनी लिहीले आहे.
महत्वाच्या बातम्या