मुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार : संजय राऊत

blank

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहे. सर्व पक्ष विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी देखील विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहचत आहेत.

आदित्य ठाकरेंनीच महाराष्ट्राच नेतृत्व कराव, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. त्यामुळे भाजप-सेना युतीची सत्ता आली तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दरम्यान, शुक्रवारी ‘जन आशीर्वाद यात्रा’ मनमाडमध्ये आली. यावेळी संजय राऊत यांनी उपस्थितांना संबोधित करताना ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेना युतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दोनही पक्षांकडून वारंवार मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे विधानसभा निवडणुकीनंतरचं स्पष्ट होणार आहे.