एकनाथ खडसे लवकरच भाजप सोडतील; संजय राऊत यांची भविष्यवाणी

जळगाव: भाजपचे जेष्ठ नेते असणारे मात्र गेल्या काही काळापासून स्वपक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे जास्त काळ भाजपमध्ये राहणार नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

जळगावमधील अजिंठा विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव देवकर, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार, किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान आता संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना आणखीनच उधाण येणार असल्याच दिसत आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी अजित पवार आणि खडसे यांच्या कानगोष्टीवर भाष्य करत ‘ आजकाल खडसे हे अजित पवारांच्या कानात जास्त बोलत आहेत, तर पवार देखील त्यांना टाळ्या देत असल्याच’ सूचक विधान त्यांनी केल आहे. तसेच खडसे भाजपातून बाहेर पडून कोणत्या पक्षात जातील हे सांगता येत नसल्याचही राऊत यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...