Sanjay Raut | मुंबई : भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आज महामोर्चाचं आयोजन केलं आहे. यावेळी आयोजित सभेत बोलताना संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आता रणनीती ठरली. रणशिंग फुंकले आहे आणि शंखही फुंकला आहे. आता ही फौज युद्धासाठी सज्ज झाली असल्याचंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.
ते म्हणाले, “आजच्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केलं आहे. राज्यपालांना पदच्युत करणारा हा विराट मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशारा या मोर्चाने दिला आहे.”
“महापुरुषांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकेल का? यांना एक मिनिट सुद्धा सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार उलथवून टाकण्याचा हा दिलेला हा इशारा आहे. आज दिल्लीही दुर्बिणीतून पाहत असेल महाराष्ट्राची ताकद काय आहे. महाराष्ट्राची शक्ती काय आहे. आज महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्र पेटलाय, ही ठिणगी पडली आहे”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “या व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आहे अन् महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत. हा सर्वात मोठा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सरकार उलथवून टाकण्याची संधी आम्हाला कधी मिळतेय याची महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनता वाट पाहत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे”; ‘महामोर्चा’च्या सभेतून अजित पवारांचा चंद्रकात पाटलांवर हल्लाबोल
- Ram Kadam | “नागपुरात भाड्याची गर्दी जमणार नसल्यानेच मुंबईत मोर्चा”; राम कदमांचा ‘मविआ’ला खोचक टोला
- Chhagan Bhujbal | “महामोर्चाचा प्रभाव कमी करण्यासाठीच भाजपचं आंदोलन”; छगन भुजबळ यांचा दावा
- Amol Mitkari | “दरेकरजी, तुमच्या घरात आंबेडकर, महात्मा फुले यांची प्रतिमा असेल तर फोटो शेअर करा आणि…”; अमोल मिटकरीचं ओपन चॅलेंज
- MVA | ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल’; महाविकास आघाडीने शेअर केले ‘महामोर्चा’ची झलक दाखवणारे व्हिडीओ