Share

Sunil Raut | संजय राऊत म्हणाले, वरती गेल्यावर मला बाळासाहेबांना गद्दार म्हणून तोंड दाखवता आले नसते

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. अशातच त्यांचा न्यायालयीन मुकाम वाढला असून पुढील सुनावणीची तारीख देखील समोर आली आहे. 1034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी १७ ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर आता यावर शिवसेना आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनी राऊतांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

यावेळी सुनील राऊत यांनी न्यायालयातील संजय राऊतांच्या भेटीदरम्यानचा एक प्रसंग सांगितला. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला रविवारपासून सुरूवात झालेली आहे. याचेच अनेक ठिकाणी मेळावेदेखील सुरू आहेत. विक्रोळीतील सुरु असलेल्या या मेळाव्यात बोलताना सुनील राऊत म्हणाले कि, संजय राऊत यांना न्यायालयात आणले होते. त्यावेळी माझे त्यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा एका व्यक्तीने संजय राऊतांना म्हटले की, तुम्ही माघार घेतली असती तर आज घरी असते, यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले वरती गेल्यावर मला बाळासाहेबांना गद्दार म्हणून तोंड दाखवता आले नसते, असे सुनील राऊत यांनी सांगितले.

तसेच यावेळी पुढे सुनील राऊत म्हणाले कि, आज जे ४० गद्दार शिवसेना सोडून गेले, त्यांनी शिवसेना हे नाव संपुष्टात आणले. संजय राऊत यांची काहीही चूक नाही. एक रुपयांचा भ्रष्टाचार संजय राऊत यांनी केला नाही. माझ्याकडे चार्जशीट आहे. हवे तर कोणत्याही वकिलाला नेऊन दाखवा. तो हेच म्हणेल की, संजय राऊतांवर गुन्हा दाखल होणार नाही; परंतु तरीही संजय राऊत जेलमध्ये आहे. कारण ते भाजपसमोर झुकले नाहीत. त्यांनी भाजपच्या अत्याचारी धोरणांविरोधात नेहमी आवाज उठवला आहे, असे देखील सुनील राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now