पीएम केअर फंडातून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी मदत करा- संजय राऊत

पीएम केअर फंडातून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी मदत करा- संजय राऊत

Sanjay Raut And Narendra Modi

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाला अखेर यश आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वादग्रस्त 3 कृषी कायदे रद्द केले. त्यानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली होती. आता आंदोलना दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यावरुन नवा वाद पेटला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. गेल्या दिड वर्षात 700 च्या आसपास शेतकरी मरण पावले. आत्महत्या केल्या, सरकारच्या गोळीबारात गेले, लखीमपूर सारख्या ठिकाणी चिरडून मारले गेले. आता सरकारने आणि पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द केले. त्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांच्या चूकीचे 700 बळी गेले. हे सगळे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांची कुटुंबं उघड्यावर पडली आहेत. अशा परिस्थित केंद्राने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत असेल तर त्यात चूकीचं काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पीएम केअर फंडामध्ये अमर्याद आणि बेहिशोबी पैसे पडलेले आहेत. त्याच फंडातून या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करावी, असं संजय राऊत म्हणाले आहेत. माफी मागणं गरजेचं नाही जी तुम्ही मागितली. या 700 कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे. मला खात्री आहे आपले पंतप्रधान सहृदयी आहेत ते नक्कीच मदत करतील, असा विश्वासही यावेळी संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या: