मुंबई : काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून ठाकरेंनी बैठकीत जशाच तसे उत्तर देण्याची शिवसेनेची खेळी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान, या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत आम्ही संयम बाळगला. किंवा ते बाळगणं संयुक्तिक असत. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन लढत नाही. आमची हत्यारं आमचीच असून ती धारधार आहेत. दोन घाव बसलेत तर पाणी मागणार नाहीत’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘शिवसेनेच्या बदनामीचा आणि खासकरून महाराष्ट्राच्या बदनामीचा हा व्यापक कट काही असामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन सुरु केला आहे. पण कोणीही समोर येऊद्या, शिवसेना छातीवर वार झेलणारा पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे. हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत.’
महत्वाच्या बातम्या:
- “शिवसेना समोरून वार करणारा पक्ष, पाठीमागचे वार…”, संजय राऊत यांचा विरोधकांना टोला
- “…तेव्हा उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते”, नितेश राणेंचा टोला
- “उद्धव ठाकरे कुदळ-फावड घेऊन मशिदीवर…”, राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला भातखळकरांचे प्रत्युत्तर
- “आम्ही अंगावर केसेस घेण्यास तयार”; अमित ठाकरेंचं पोलिसांना आव्हान
- “योगींच्या भगव्या वस्त्राचा अपमान…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला