मुंबई : काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नाइट क्लबमध्ये पार्टी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत कसलेही राजकारण करू शकतात, त्यांच्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा करता येणार नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘देशात इतके भयंकर प्रश्न निर्माण झाले असताना राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये कसे काय जाऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित केल्याने काँगेस पक्षाची अडचण झाली आहे. भाजपने काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला आहे. जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत कसलेही राजकारण करू शकतात, त्यांच्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा करता येणार नाही.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘कश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत रमजान ईदच्या दिवशी दंगली झाल्या, सुरक्षा दलावर हल्ले झाले. ही परिस्थिती भारतीय जनता पक्षाला चिंताजनक वाटू नये याचे आश्चर्य वाटायला हवे. कश्मीरची दंगल मोदींमुळे भडकली नाही, तशी जोधपूरची दंगल राहुल गांधींमुळे पेटली नाही, तरीही पंतप्रधान मोदी यांची जबाबदारी या प्रकरणात जास्त आहे. राहुल गांधी हे राजकारणात गंभीर आहेत की नाही याबाबत त्यांचा काँगेस पक्ष निर्णय घेईल, पण देशातील अनेक प्रश्नांबाबत मोदींचे सरकार किती गंभीर आहे? यावर आता चर्चा व्हायला हवी, पण चर्चेचा स्तर नाईट क्लबपर्यंत आणून ठेवल्यावर कसली चर्चा होणार?’, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अंधारयात्रेवर चर्चा करण्याचे सोडून राहुल गांधी नाईट क्लबात गेले यावर…”, संजय राऊत यांची टीका
- “घालीन लोटांगण, वंदीन चरण…”, राहुल गांधींच्या ‘त्या’ फोटोवरून राम कदम यांचा शिवसेनेवर निशाणा
- “उध्दवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”- देवेंद्र फडणवीस
- IPL 2022 RCB vs CSK : विराटची गाडी पुन्हा अडकली..! बंगळुरुचं चेन्नईला १७४ धावांचं आव्हान!
- IPL 2022 RCB vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज जवळपास स्पर्धेबाहेर..! बंगळुरुसमोर धोनीसेना ढेपाळली आणि…