मुंबई : २७ एप्रिल रोजी कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याविषयी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले असून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन आहे, अशी घणाघाती टीकाही राऊतांनी केली आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन आहे. देशभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चौथी लाट येईल की काय, या चिंतेने पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, हे कौतुकास्पद आहे. कोरोना प्रतिबंधक लस, ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालयांची तयारी यांचा आढावा घेतला. हे सगळे ठीक असले तरी या कोरोना बैठकीमागचा मूळ हेतू वेगळाच होता. बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘टोमणे’ मारणे, हाच या संवाद बैठकीचा हेतू होता. कारण इंधनाच्या भाववाढीवरून बैठकीत वादाची ठिणगी पडली. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरी पार आहेत.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘काँगेस राजवटीत पेट्रोल ७० रुपये लिटर झाले तेव्हा भाजप थयथयाट करीत महागाईविरोधात रस्त्यावर उतरला होता. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी तेव्हा ”पंतप्रधान महागाईवर बोलत का नाहीत? ते गप्प का आहेत?” अशा प्रश्नांचा भडीमार करीत होते. आता मोदी मंत्रिमंडळातील सदस्य महागाईचे समर्थन करतात व मोदी हे काय पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करण्यासाठी पंतप्रधान झालेत काय? असे उलट प्रश्न करतात. पेट्रोल-डिझेलची भाववाढ हे जागतिक संकट आहे, असे पंतप्रधानांचे सांगणे आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा हा परिणाम आहे हे मान्य. पण मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही पेट्रोल-डिझेलचे आजच्या प्रमाणेच जागतिक संकट होते’, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “…या विषयांवरून लक्ष उडविण्यासाठी पंतप्रधान वादग्रस्त विषयांना फोडणी देताय”, राऊतांचे टीकास्त्र
- गणेश नाईक यांच्यावर आरोप करणारी महिला राष्ट्रवादीत जाणार ?
- Mungantiwar vs Nilam Gorhe | “मुनगंटीवार जे बोललेत त्याचा त्यांना पश्चाताप…”- नीलम गोऱ्हे
- IPL 2022 DC vs KKR : कुलदीपचा पुन्हा चौकार..! कोलकाताचं दिल्लीला १४७ धावांचं आव्हान
- IPL 2022 DC vs KKR : कोलकाताचा अजून एक पराभव; दिल्लीसाठी कुलदीप पुन्हा ठरला गेमचेंजर!