मुंबई : २७ एप्रिल रोजी कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याविषयी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले असून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसेच स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा हा प्रयत्न आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘मोदी यांनी ‘कोरोना’ बैठकीत इंधन दरवाढीचा विषय काढला. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी करावा असे पंतप्रधानांनी सुचवले. स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी हे प्रत्येक बाबतीत राज्यांना जबाबदार धरत आहेत. मग केंद्र सरकार फक्त सत्ता भोगायला बसले आहे काय? पेट्रोल-डिझेलची भाववाढ, कोळशाचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा यासाठी त्यांनी राज्यांनाच जबाबदार ठरवले. मग केंद्र काय फक्त घंटा वाजवायला बसलेय.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदींच्या एकतर्फी संवादानंतर सडेतोडपणे सांगितले की, केंद्राने महाराष्ट्रावरील अन्याय थांबवावा. देशाच्या एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा 38.3 टक्के आहे. मात्र कराच्या केवळ 5.5 टक्केच रक्कम परत मिळते. देशाला सर्वाधिक महसूल महाराष्ट्रच देत आहे. तरीही राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा 26 हजार 500 कोटी केंद्र सरकार देत नाही. ज्या राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री नाहीत त्या राज्यांशी केंद्राचे मोदी शासन वैराने वागत आहे. तंगडय़ात तंगडे टाकून अडथळे निर्माण करीत आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- “…या विषयांवरून लक्ष उडविण्यासाठी पंतप्रधान वादग्रस्त विषयांना फोडणी देताय”, राऊतांचे टीकास्त्र
- “पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- Mungantiwar vs Nilam Gorhe | “मुनगंटीवार जे बोललेत त्याचा त्यांना पश्चाताप…”- नीलम गोऱ्हे
- IPL 2022 DC vs KKR : कुलदीपचा पुन्हा चौकार..! कोलकाताचं दिल्लीला १४७ धावांचं आव्हान
- IPL 2022 DC vs KKR : कोलकाताचा अजून एक पराभव; दिल्लीसाठी कुलदीप पुन्हा ठरला गेमचेंजर!