मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेशमध्ये ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देत असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माविआ सरकारवर टीका केली. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या टीकेवर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘ही सर्व भोंगेबाजी असून आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं? हा संशोधनाचा विषय आहे.’ तसेच उत्तर प्रदेशातील भोंगे उतरवण्यात आले नसून तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारचे पालन महाराष्ट्रातही करण्यात यावं, अशीच सरकारची भूमिका आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, ‘उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’. तसेच महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,’ असे राज ठाकरे योगी सरकारने केलेल्या भोंग्याच्या कारवाईवर बोलतांना म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…असे म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का?”, सचिन सावंत यांचा राज ठाकरेंना सवाल
- “ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून…”, ‘त्या’ प्रकरणावरून केशव उपाध्येंचा शरद पवारांना टोला
- “मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी कोणीही आले तर…”, रामदास आठवले यांचा इशारा
- राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर; राजकीय वातावरण तापणार? चर्चांना उधाण
- “…हे पवार साहेबच करू शकतात”, ‘त्या’ प्रकरणावरून निलेश राणेंचा टोला