मुंबई : मुंबईतील सोमय्या मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्ताने सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता, असे फडणवीस यांनी म्हटले. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे हा राष्ट्रीय प्रश्न आहे व त्यावर केंद्र सरकारला एक धोरण आखावे लागेल. बेकायदेशीर काही होत असेल तर ते रोखणे हे राज्य सरकारचे काम आहे, पण भोंग्यांच्या प्रश्नावर भाजपच्या उपवस्त्रांना दोन सभा घ्याव्या लागतात, लोकांना भडकविण्याची भाषा करावी लागते. म्हणजे भाजपला वैफल्याने ग्रासले आहे व फक्त धार्मिक तणाव निर्माण करायचा आहे. हिंदू-मुसलमानांतील दंग्यांनी आजवर दोन्ही बाजूचे प्रचंड नुकसान झाले आहे. संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत शिवसेना हिंदुत्व रक्षणाची ढाल म्हणूनच वावरली आहे, पण या लढाईत भाजप व त्यांची आजची उपवस्त्रे कोठे होती? आता या मंडळींना हिंदू हिंदूंतच दंगली पेटवायच्या आहेत. मुंबईत मराठी माणसांत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले नाहीत. आता हिंदूंनाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरवायचे हा कावा स्पष्ट दिसतो आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘भाजपवाले आता ऊठसूट बाबराचे भजन करू लागले आहेत. हा बदल बरा नाही. धमक्या व इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का व कसे घाबरताय त्यावर बोला. लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य घुसल्यापासून कोणाची कशी हातभर फाटली आहे ते देशाने पाहिले आहे. बाबरी आम्हीच पाडली असे सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही. चीननेही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावले आहेत व ते देशाला आव्हान देत आहेत की, ”आम्ही येथून बाहेर पडणार नाही!” मग ते भोंगेही उतरवा व चिन्यांनाही हाकला. तरच तुम्ही हिमतीचे’, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “फडणवीस ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा…”, संजय राऊतांचा खोचक सवाल
- “…त्यामुळे ‘गधा’धारी कोण हे स्पष्ट झालं”, भाजप आणि मनसेच्या सभेवरून संजय राऊत यांचा टोला
- “दयाभाव आणि दातृत्व सांगणारा सण”; मुख्यमंत्र्यांकडून ईदच्या शुभेच्छा!
- IPL 2022 KKR vs RR : राजस्थानचं कोलकाताला १५३ धावांचं आव्हान; कप्तान सॅमसननं लढवला किल्ला!
- IPL 2022 KKR vs RR : जीवात जीव आला..! सलग पाच पराभवानंतर कोलकातानं नोंदवला विजय; राजस्थानला दिली मात!