‘या वाघानं तुम्हा सगळ्यांना खेळवलं आणि लोळवलं सुद्धा आहे’

‘या वाघानं तुम्हा सगळ्यांना खेळवलं आणि लोळवलं सुद्धा आहे’

chandrakant patil vs sanjay raut

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ‘उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत,’ असं विधान करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ‘युती’चे संकेत दिलेत.

यावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. ‘आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघांशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघांशी नाही’ असं म्हणत पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना डिवचलं होतं. आता, राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेना काय आहे, कोण वाघ आहे हे देशानं पाहिलं आहे. या वाघांची जातकुळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून कळतंच. या वाघानं तुम्हा सगळ्यांना खेळवलं आणि लोळवलं सुद्धा आहे,’ असं रोखठोक भाष्य संजय रूपात यांनी केलंय.

कोणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो – संजय राऊत

चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी आज उत्तर दिले आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.’

चंद्रकांत पाटलांचा पलटवार !

संजय राऊत यांच्या विधानानंतर पाटील प्रत्युत्तर देणार नाहीत असं कसं होईल ? ते म्हणाले, ‘संजय राऊत याचं म्हणण खरं आहे. आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघांशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघांशी नाही. वाघ जोर्पर्यंत बाहेर होता तोपर्यंत आमची दोस्ती होती. पण आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात अडकलाय. त्यामुळे आमची दोस्ती ही फक्त जंगलामध्ये असणाऱ्या वाघांशीच होते.’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना चागलच फैलावर घेतले होते. त्यांच्या या विधानालाच संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रत्युत्तर देताना, ‘या वाघानं तुम्हा सगळ्यांना खेळवलं आणि लोळवलं सुद्धा आहे,’ असा टोला लगावलाय.

महत्वाच्या बातम्या