Share

Sanjay Raut | “समर्थन केलं नाही हा खुलासा होत नाही, नामर्दपणा…”, संजय राऊतांचं उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : भाजप (BJP) नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्य केली जातं आहे. यावरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा खूब समाचार घेतला असून समर्थन न केल्याचा आरोप केला आहे. राज्यपालभगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखी महाराजांबद्दल वक्तव्य केलं आहे.

यावेळी, उदयनराजे ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाकडून अपमान झाला आहे, तरीही तो पक्ष अजूनही माफी मागायला तयार नाही. नूपुर शर्मा यांनी मागे विधान एक वादग्रस्त विधान केले होते, त्याला आम्ही विरोध केला होता, संपूर्ण देशात विरोध सुरू झाल्याने त्यांना पक्षातून काढून टाकले होते, असं संजय राऊत म्हणाले.

तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय प्रवक्ते त्रिवेदी यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, वक्तव्य करणाऱ्या नेत्यांबद्दल भाजपने निषेध व्यक्त केला नाही. कॅबिनेटमध्ये निंदा प्रस्ताव यायला पाहिजे होता, त्यानंतर तो केंद्राकडे पाठवून त्यांना परव बोलवा म्हणून सांगायला पाहिजे होते. उलट फडणीवस यांनी आम्ही समर्थन केलं नाही असा खुलासा होत नाही. हा नामर्दपणा आहे. आणि तो खुलासा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : भाजप (BJP) नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्य केली जातं आहे. यावरुन संजय राऊत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now