नवी-दिल्ली : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी(१३ जाने.) पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. परंतु या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित असल्याचे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाष्य केले आहे.
यासंदर्भात दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की,’मुख्यमंत्री नाही हजर राहिले, कधी काळी पंतप्रधानही एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत. ज्यांच्याकडे सगळी सूत्रं आहेत ते आरोग्यमंत्री होते. त्यांना कमी का लेखत आहात?’ तसेच भाजपाच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय दुसरे काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. भारत-पाकिस्तानवर रोज बोलत आहे, पण आता भारत-चीनवर बोला आणि टीका करा’, असे राऊत म्हणाले आहेत.
Speaking at meeting with the Chief Ministers. https://t.co/VDA7WeB7UA
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2022
दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीस गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandvia), काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी(Charanjit Sing Channi), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत(Ashok Gehlot) आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल(Bhupesh Baghel), महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope)आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- “पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा?”, मनसेचा इशारा
- राज ठाकरेंच्या सल्ल्यावर संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले,‘कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना…’
- “उत्तरप्रदेशातील उपेक्षित, शोषित समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध”
- “ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा”, पंतप्रधान मोदींचा इशारा
- कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा- पंतप्रधान मोदी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<