मुंबई: महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल (१ मे ) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मशिदिंवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोणत्या कलमाखाली काय कारवाई केली जाईल, हा कायद्याच्या चौकटीमधील विषय आहे. काहीच काम नसल्याने या विषयावर बोलत असाल तर तुम्ही राज्य आणि देशाचे राजकारण खऱाब करत आहात. ते राष्ट्रहिताचं नसून राष्ट्राला आणि राष्ट्रीय एकात्मतेला मारक आहे. भोंग्यामुळे लोकांना त्रास होतो हे आमचंही मत आहे. आम्ही त्याविरोधात लढाई दिली आणि त्यानंतर कोर्टाने निकाल दिला आहे. त्यामुळे देशात कायद्याचं राज्य असेल तर पालन करायलाच हवं.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान मशिदींवरील भोंग्यांचा विषय हा नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी तो मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय सुचवला आहे. ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर लावले जातील, त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. भोंग्यांचा विषय हा सामाजिक आहे, धार्मिक नाही. त्याला कुणी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही धर्माचा आधार घेता येतो. असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जातात, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल करत राज ठाकरेंनी मविआ सरकारवरही निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- “…काळातील CBI अहवाल तपासा”, बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती विचारणाऱ्या फडणवीसांना राऊतांचा सल्ला
- “खोटं बोल पण रेटून बोल”, ही शिवसेनेची नवी संस्कृती; केशव उपाध्येंचा टोला
- “हनुमान चालिसाचे पठण करा बोलणारे आता शरद पवार यांच्या नावाचे…”, राष्ट्रवादीचे टीकास्त्र
- “4 तारखेनंतर अजिबात ऐकणार नाही”, भोंग्याबाबत राज ठाकरेंचा इशारा
- “भाडोत्री गर्दी ‘भ्याड’ वक्ता अन् सतरंजी उचलायला…”, शिवसेनेचा हल्लाबोल