मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात महात्मा फुले विरुद्ध लोकमान्य टिळक असा वाद चांगलाच पेटून उठलेला दिसत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच ज्यांना काहीच निर्माण करता येत नाही तेच इतिहास चिवडत बसतात किंवा इतिहास उद्ध्वस्त करतात, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘बाजीप्रभू देशपांडे यांच्या खऱ्या-खोट्या चित्रावरून इतिहासकारांनी वाद घातला. पावनखिंडीत हौतात्म्य पत्करणाऱ्या बाजीप्रभूंचे महत्त्व एका चित्रपटात कसे मारून टाकले हे मी पाहिले. शिवाजी महाराजांसाठी पावनखिंडीत धारातीर्थी पडलेल्या बाजीप्रभूंचे शौर्य नाकारणे हा कोणता इतिहास? मराठ्यांच्या इतिहासातील गोंधळ इतिहास संशोधकांनीच किती निर्माण केला याचेच संशोधन आता झाले पाहिजे. सूर्याजी पिसाळाचे रंगविलेले व्यक्तिचित्र चुकीचे आहे, असे सेतुमाधवराव पगडी म्हणतात. कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांपुढे आलीच नव्हती असेही ते म्हणतात.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘पुण्याच्या केळकरांनी आपल्या संग्रहालयात मस्तानी महाल उचलून आणला हे प्रसिद्ध झाले तेव्हा तो महाल मस्तानीचा असूच शकत नाही असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, पण जेम्स लेनने शिवाजी महाराज व त्यांच्या मातेविषयी तद्दन खोटा इतिहास लिहिला व जगात महाराष्ट्राच्या इतिहासाची बदनामी केली तेव्हा त्यांचा धिक्कार करण्यासाठी किती इतिहासकार व त्यांचे राजकीय समर्थक पुढे आले? इतिहास किती चिवडत बसाल? ज्यांना काहीच निर्माण करता येत नाही तेच इतिहास चिवडत बसतात किंवा इतिहास उद्ध्वस्त करतात. दिल्लीत व महाराष्ट्रात तेच घडत आहे’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “फुले विरुद्ध टिळक हा वाद निरर्थक, शिवराय महाराष्ट्रात जन्मले हेच…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
- “हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरेंनी…”, संजय राऊत यांचे टीकास्त्र
- IPL 2022 : “आई फक्त तुझ्यासाठी…” स्पेशल जर्सी घालून मैदानात उतरले लखनऊचे खेळाडू; पाहा VIDEO!
- IPL 2022 LSG vs KKR : केएल राहूल शून्यावर OUT..! लखनऊचं कोलकाताला १७७ धावांचं आव्हान
- IPL 2022 LSG vs KKR : लखनऊ ऑन टॉप..! कोलकाताचा तब्बल ७५ धावांनी उडवला धुव्वा