Sanjay Raut | पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो; संजय राऊत म्हणाले, “सामंतांचा संबंध….”

Sanjay Raut | मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावरील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुन ‘वारिशे यांची हत्या करण्यात आली आहे’, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या हत्या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटत आहेत.

संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र (Sanjay Raut wrote letter to Devendra Fadnavis) 

संजय राऊतांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता वारिशे यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, याच प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत यांनी उदय सामंत यांचा एक फोटो ट्वीट केल्यामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. यावरुन आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर आता या फोटोबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

“सामंतांचा संबंध या प्रकरणाशी…”

“मी उदय सामंत यांचा या प्रकरणाशी संबंध लावत नाहीये. या निमित्ताने अनेक वेगवेगळे फोटो समोर आणले जातात. मात्र हा आरोपी किती चतूर आहे, असे मी म्हणत आहे. तो सध्या तुरुंगात आहे. मात्र त्याचे अनेक राजकीय लोकांसोबत संबंध आहेत. राजकीय लोकांसोबत फोटो काढणे आणि भ्रम निर्माण करणे, असे त्याच्याकडून केले गेले. या प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात कोणाचाही दबाव नसावा असे माझे मत आहे. महाराष्ट्रीतील सध्याचे सरकार गुन्हेगारांना, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत,” असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

“वारिशेंची हत्या ही राजकीय हत्या” (Sanjay Raut Talk about journalist Shashikant Warishe Muder)

“शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. कारण या प्रकरणात तेथील स्थानिक नेत्यांचा जिल्हा स्ताराच्या पोलिसांवर दबाव असू शकतो. नाणार रिफायनरी होऊ नये अशी आमची भूमिका होती. तीच भूमिका मृत्यू झालेल्या पत्रकाराचीही होती. प्रकल्प येणार आहे म्हणून बाहेरच्या श्रीमंत लोकांनी तेथे जमिनी खरेदी केल्या. याविरोधात ते लढत होते. त्यांचा आवाज बंद होत नाही, हे समजल्यानंतर वारिशे यांची हत्या करण्यात आली. शशिकांत वारिशे यांची हत्या ही राजकीय हत्या आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

राऊतांनी शेअर केलेल्या फोटोवर सामंतांची प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “संजय राऊतांना जो फोटो ट्वीट केला आहे तो जुना आहे. हा फोटो नाकारण्याचे काही कारण नाही. कारण मी मंत्री होऊन रत्नागिरीला गेलो होते. अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात. तसाच तोही एक फोटो होता. तो फोटो काढला याचा अर्थ मी त्याला पाठबळ दिले असा त्याचा अर्थ होत नाही. कारण त्या व्यक्तीचे राज्यातील अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनतेही ते पाहिलेले आहे. जो कोणी नेता त्याच्यासोबत आहे, तो यामध्ये सामील आहे, असे घाणेरडे राजकारण करणे योग्य नाही असे मला वाटते,” अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button