Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा तापला आहे. सीमाभागात लोकांनी निदर्शनेही केली. या घटनेबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. अमित शहा यांनी प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने दोन्ही राज्यांना शांत राहण्याचे सांगितले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “सीमाप्रश्नावर अमित शहा यांनी मध्यस्थी केली नाही. जैसे थे परिस्थिती निर्माण करणे ही मध्यस्थी नाही. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर परीस्थिती जैसे थे आहे. ही सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे. तुम्ही महाराष्ट्राला मुर्ख समजला का?, तुम्ही महाराष्ट्राला नॅनो बुद्धीचे समजला. हा ज्ञानदेवांचा महाराष्ट्र आहे नॅनो बुद्धीचा नाही. शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी ७० हुतात्मे दिले आहेत. जर परिस्थिती जैसे थे निर्माण करायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी तिकडे काय तोंड उघडलं. उपमुख्यमंत्री काय बोलले?.”
“बेळगाव महापालिकेवरचा भगवा झेंडा उतरला तो परत लावा. शिवरायांचा तो भगवा झेंडा होता. तो कन्नड सरकारने उतरवला. त्यानंतर मराठी लोकांवर गुन्हे दाखल केले. ते मागे घ्या, त्याला मी जैसे थे परिस्थिती म्हणेल. अमित शहांच्या बैठकीत काहीही घडलं नाही. ७० वर्षाचा प्रश्न १५ मिनिटात संपवला. आमचे हजारो लोक तुरुंगात जात आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे त्यांचा मोर्चाही..”; देवेंद्र फडणवीस यांचा मिश्किल टोला
- Uddhav Thackeray | “…तर आपणही यांच्यासारखे मंत्री बनून शाब्दीक भीक मागत असतो”; उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं
- Eknath Shinde | “नाना पटोलेंसारखा स्वाभिमानी नेता बळजबरीने महामोर्चात सहभागी”; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा दावा
- Sharad Pawar | “राज्यपालांची हकालपट्टी करा, नाहीतर…”; शरद पवार यांचा इशारा काय?
- Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही”; संजय राऊत असं का म्हणाले?