मुंबई: ईडीने ममता बॅनर्जींचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना समन्स बजावले आहे. कोळसा घोटाळ्याप्रकरणी या दोघांचीही पुढील आठवड्यात चौकशी होणार आहे. ईडीने अभिषेकला 21 मार्चला आणि त्याच्या पत्नीला 22 मार्चला तपासकर्त्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आहे अभिषेक बॅनर्जी त्याला केंद्रीय तपास यंत्रणेने आज दिल्लीमध्ये बोलवले आहे. त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. महाराष्ट्रावर देखील ते सुरू आहे पण ममता बॅनर्जींनी सांगितले आहे. मी दिल्लीच्या सत्तेपढे झुकणार नाही. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल चा स्वभाव एकच आहे”, असे ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: