मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commision) शिवसेना (Shivsena) पक्षाचं धुष्यबाण चिन्ह आणि नाव देखील गोठवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते प्रतिक्रिया देत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया –
यादरम्यान, नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल, भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. या आधीही अनेक पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली आहेत, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांची हाय कोर्टात धाव –
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण गोठवला आहे. या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाकडून रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा आरोप यामधून केला आहे. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करता निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवण्याचा निर्णय घेतला, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
या याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी देखील शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे यावर दिल्ली उच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bhaskar Jadhav | “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं होत, संपूर्ण भाषण वाचून झाल्याशिवाय…” ; भास्कर जाधव यांची खोचक टीका
- CNG Car Update | जबरदस्त मायलेजसह ‘या’ आहेत बेस्ट CNG कार
- Shelar vs Pawar | शरद पवारांविरुद्ध आशिष शेलार मैदानात! कोण मारणार बाजी?
- Uddhav thackeray | निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरेंची हायकोर्टात धाव
- Uddhav Thackeray | “उलट्या काळजांच्या लोकांनी कट्यार काळजात घुसवली”; उद्धव ठाकरे भावूक