“…यावर फडणवीस का बोलत नाहीत?”, राऊतांचा सवाल

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राइव्ह बॉम्ब टाकल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही प्रतिक्रिया देत यामागे नक्की काय आहे? भाजपचे सलीम-जावेद कोण आहेत? असा सवाल करत फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे.

“पुरावे सादर करायला अभ्यास किंवा संयम लागत नाही. ती तेवढ्यापुरती सळसळ असते आणि खळबळ असते. खळबळ माजवने हाच जर हेतू असेल विरोधी पक्षाचा, तर ती खळबळ देखील माजलेली नाही. काल मी ईडीवर पुराव्यासह काही आरोप केले आहेत ते खळबळजनक आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई आणि महाराष्ट्रात काय काम करत आहेत त्यांच्या खंडणीखोरी ची प्रकरणे समोर आलेली आहेत त्यावर फडणवीस का बोलत नाहीत?”, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईंचा अपमान केला त्यावर काही भूमिका घेतली असती तर त्यांच्या कालच्या पेन ड्राईव्ह ला काही महत्त्व आलं असतं तुम्ही एक तर्फी काम करत आहात विरोधी पक्षनेता हा राज्याच्या जनतेची भूमिका मांडत असतो हे विरोधी पक्षनेते विसरलेले दिसत आहे. असा टोलाही राऊत यांनी लगावल आहे.

महत्वाच्या बातम्या –