fbpx

‘न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे उलटून गेली तर राम मंदिर होणार नाही’

टीम महाराष्ट्र देशा- न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे उलटून गेली तर राम मंदिर होणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. केंद्र सरकारने मंदिर उभारणीसाठी लवकरात लवकर कायदा करावा किंवा अध्यादेश काढावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या भेटीची पूर्ण तयारी झाली आहे. येत्या २५ नोव्हेंबरला ते अयोध्येला जाणार आहेत. तिथे जाऊन ते मोदीजींना आणि भाजपा सरकारला राम मंदिराच्या आश्वासनाची आठवण करुन देणार आहेत.न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत बसलो तर १ हजार वर्षे उलटून गेली तर राम मंदिर होणार नाही.