लवकरच पवारांचे ‘पगडी’ राजकारण बाहेर येईल – राऊत

पुणे : शरद पवार हे कोणतीही कृती जाणूनबुजून करतात परवाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी असंच केलं. त्यांनी पुणेरी पगडी काढून त्याजागी पागोटे घातले, मात्र या पगडी खाली नेमकं दडलंय काय हे येत्या काळात स्पष्ट होईल असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात केलं.सर्वांनी पगडीचा सन्मान राखण गरजेचं त्यामुळे शरद पवारांनी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Loading...

म.फुले मंडई प्रतिष्ठान व शिवसेना कसबा विभागाचे वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तृतीय पंथी कार्यकर्त्याचा व पोलीस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले यांच्या पागोट्यानेच स्वागत करायचं, असा आदेश दिला.पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करण्याचा निर्णय घेतला.

पवारांच्या याच कृतीचा राऊत यांनी समाचार घेतला. पगडी ही पुणेकरांचा सन्मान आणि वैभव आहे, सर्वांनी पगडीचा सन्मान राखण गरजेचं त्यामुळे शरद पवारांनी पगडी नाकारणे हा पुणेकरांचा अपमान आहे . त्यांच्या प्रत्येक कृतीत काही न काही अर्थ असतो. लवकरच पगडीच्या मागे काय राजकारण दडले आहे हे बाहेर येईल म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच पगडीच्या खाली आणि वर काय राजकारण आहे हे बाहेर येईल असंही ते म्हणाले.दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेतही एक तृतीयपंथी आमदार पाहिजे अशी मागणी केली.Loading…


Loading…

Loading...