गोवा : शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay Raut) हे सध्या गोव्यात असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यासंदर्भात माहिती देत संजय राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली’, असे राऊत यांनी सांगितले आहे.
आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव
दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. pic.twitter.com/FYO629eX2h— Sanjay Raut (@rautsanjay61) January 3, 2022
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी संजय राऊत हे चार दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याची चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? उदय सामंतांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
- पुणे जिल्हा बँकेची आज मतमोजणी; अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
- अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- ‘…पण अखेर त्याने मला गाठलंच’, पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित पवार यांची भावनिक पोस्ट
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<