शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या भेटीला संजय राऊत, चर्चांना उधाण

शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या भेटीला संजय राऊत, चर्चांना उधाण

Sharad Pawar And Sanjay Raut

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. अमरावती हिंसाचार प्रकरण असेल, शेतकरी मोर्चा, कृषी कायदे, किंवा मग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला तर एकीकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्याचे चिघळत चाललेलं आंदोलन. या सर्व मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी सुरुच आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्य शासनामध्ये करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा देत राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar), आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिलेल्या इशाऱ्यावरुन परिवहन मंत्री (Anil Parab) यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. आणि आता शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.

संजय राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत. याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, संजय राऊत अचानक शरद पवारांच्या भेटील आल्याने तर्क वितर्कांना लावले जात आहेत. संजय राऊत हे काही वेळापूर्वीच वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या भेटीसाठी संजय राऊत चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. या भेटीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची या बाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या