राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे – खा. संजय राऊत

sanjay raut

मुंबई : राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणतात, ‘उदय सामंत यांनी मत व्यक्त केलं, राज्यपाल हे कुलपती आहेत, त्यांनी त्यांचं मत सांगितलं, त्याबाबत सरकार-संबंधित मंत्री निर्णय घेतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे-माझे जुने संबंध, राज्यपालांना सरकार काय करतंय याची माहिती आहे,’ असं राऊत यांनी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं,’ असं राऊत म्हणाले.

दरम्यान, ‘राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत, खूप दिवस व्यक्तीशा भेटलो नव्हतो, बऱ्याच दिवसापासून भेट राहिली होती, त्यामुळे सदिच्छा भेट घेतली,’ असं खा. संजय राऊत म्हणाले.