राज्यपालांना वाकून केलेल्या नमस्कारामुळे संजय राऊत होत आहेत ट्रोल

sanjay raut and bhagat sing koshiyari

मुंबई : शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून खासदार संजय राऊत यांच्याकडे पाहिलं जातं. राऊत हे नेहमी या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असतात. आता आज देखील राऊत हे जरा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा होऊ नये, असे म्हणत आणि मला मूर्ख रामलाल या राज्यपालाची आठवण येते आहे, असे सांगत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज खुद्द राजभवनवर जाऊन कोश्यारी यांची भेट घेतली.

या भेटीबाबत राऊतांनी स्पष्टीकरण दिले. ही सदिच्छा भेट होती. बरेच दिवस राज्यपालांशी भेट झाली नव्हती. त्यामुळे आज भेटलो, असे ते म्हणाले.राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, एखाद्या पिता-पुत्राने त्यांचे संबंधत आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, असेही राऊत म्हणाले.

या भेटीबाबत बोलताना राऊत म्हणाले,विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी, असे देखील राऊत म्हणाले.

मात्र या मुद्याबरोबरच राऊत हे आणखी एका गोष्टीसाठी आज चर्चेत आहेत. आज भेट घेताना राऊत यांनी राज्यपालांना कंबरेतून वाकत नमस्कार घातला. विशेष म्हणजे राऊत यांचा हाच फोटो राजभननने ट्विट केला. दिवसभर आज याच फोटोची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांना या फोटोवरून अनेकजण ट्रोल करत आहेत.

भाजपाने प्रत्येक प्रेसनोटसोबत हाजमोला गोळ्या मोफत वाटाव्यात : सचिन सावंत

होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या घरास स्टीकर लावणे बंधनकारक

आदित्य ठाकरेंनी खालील पातळीचा विश्वविक्रम याबद्दल बोलूच नये, कारण…