‘संजय राऊत, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा’; रवी राणा यांचे आव्हान

ravi rana

अमरावती : २० जुलै नंतर सलग ३-४ दिवस झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे विदर्भातील काही भागांमध्ये देखील पावसाने हाहाकार माजवल्यामुळे शेतकऱ्यांसह अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, नेते हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत असून विदर्भातील भागांमध्ये मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

यावरून आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ‘मुसळधार पावसामुळे विदर्भात मोठे नुकसान झालं आहे. अमरावतीमध्ये देखील अनेकांची घरे पडली आहेत. अनेक शेतकरी वाहून गेलेत. पिकांचं देखील नुकसान झालं आहे, तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौरा केला नाही,’ असं म्हणत राणा यांनी नाराजी व्यक्त केली.

तासोबतच, ‘ अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या ३ महिन्यात ४९ बालमृत्यू झालेत, याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. त्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भ दौरा करायला लावा,’ असं आव्हान देखील रवी राणा यांनी दिलं आहे. पुढे ते म्हणाले, ‘महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्यावर टीका करत आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या