fbpx

संजय राउत यांची राधाकृष्ण विखेंना ऑफर

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि खासदार संजय राउत यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. सुजय विखे भाजपात गेल्याने तुम्ही शिवसेनेत घरवापसी करा आणि सेना -भाजपा युतीला आणखी मजबूत करा असं विधान संजय राउत यांनी केल आहे.

याआधी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे यांनीही कॉंग्रेस सोडली होती. ते राजकारणात इतकी वर्षे असतानाही मंत्रिपद मिळालं नव्हतं, तेव्हा शिवसेनेने ते दिलं होतं. तिसरी पिढीही भाजपसोबत जाते ही चांगली गोष्ट आहे. सेना -भाजपा युतीच्या वेळी जे वक्तव्य केल होतं त्यांनी आता ते तपासावं. उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी भान ठेवायला हव होतं असं ते म्हणाले. राजकारणात सय्यम ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्यांना आता राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांनी आता शिवसेनेत याव असं संजय राउत म्हणाले.