मुंबई : गेल्या काही दिवसात शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेचे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची साथ सोडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारले आणि जवळपास 40 हुन जास्त आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक आमदारांनी शिवसेनेच्या पदांचे राजीनामे दिले आणि शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. पण या सगळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र नेहमीच बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाला शिवसेना त्यांची असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी माध्यमांशी बोलताना बंडखोरांवर आक्रमक शब्दात टीका केली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्यांची लोक गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, “राज्यात सत्याचा खून केला जात आहे. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा पुरावा देईल आणि शिंदे गटात सामील झालेल्यांची जनताच गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. त्यांची राजकीय तिरडी उठणारच. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा त्यांना कधीच माफ करणार नाही”, अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीका केली आहे.
राऊत असेही म्हणाले की, “शिवसेना हा केवळ एक पक्ष नाहीतर महाराष्ट्राची अस्मिता आहे. ज्यांनी शिवसेनेच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा बंडखोरांना जनता कधीच माफ करणार नाही.” तसेच येत्या 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाप्रमाणे ते सर्व पुरावे सादर केले जातील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane: “त्या लुक्या…, आदित्य साहेब म्हणायचं…”,निलेश राणेंची ठाकरेंना डिवचले
- Chandrkant Khaire : “ज्या धर्मवीर दिघेंच्या आशीर्वादानं मोठा…”,चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
- Thackray vs Shinde : शिवसेना उध्दव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आता निवडणूक आयोग घेणार निर्णय
- mahesh tapase | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत – महेश तपासे
- 68th National Film Award । ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘तान्हाजी’ला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<