“…यामुळे राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत”, संजय राऊतांनी सांगितले कारण

मुंबई: गुजरातमधील हार्दिक पटेल आणि पंजाबमधील सुनील जाखड यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला लागलेल्या गळतीबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून चिंता व्यक्त करत यामागील कारणही स्पष्ट केले आहे.

काँग्रेस दिशाहीन पक्ष आहे. काँग्रेसकडे दूरदृष्टीचा अभाव आहे, असे हार्दिक पटेल याचे म्हणणे आहे. काँग्रेसने देशभर ६५०० पूर्णकालीन कार्यकर्ते नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, पण उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांना प्रदेशाध्यक्ष नाहीत. या दोन मोठ्या राज्यांच्या नेतृत्वाशिवाय उदयपूरचे चिंतन शिबीर झाले. सोनिया गांधी यांचे वय आणि प्रकृती याबाबत अनेकांना चिंता वाटते. अर्थात, काँग्रेसचे नेतृत्व त्या तरीही करतात व त्यांचाच शब्द प्रमाण मानला जातो. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच २०२४ ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करीत असताना काँग्रेसमधील ‘गळती’ हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: