मुंबई : काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभावनामध्ये काल रात्री ७.३० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.संजय राऊत आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबत शुभेच्छा देखील दिल्या. मात्र आज प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एक बोचरी टीका फडणवीस यांच्यावर केली आहे.
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांचे राइट हँड आहेत” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. त्याबरोबरच सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र याला संजय राऊत यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले आहे.
सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवला असे म्हणता येणार नाही. कारण मग नारायण राणे यांना मुख्यमंत्री का बनवलं नाही? असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केलाय.
देवेंद्र फडणवीसांवर यावेळी संजय राऊत यांनी निशाणा साधला. हे मोठं मन फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी दाखवलं असतं तर सुरुवातीला ते मुख्यमंत्री झाले असते असा खोचक टोला संजय राऊत यांनी यावेळी फडणवीस यांना लगावला आहे. हे राजकारण सोयीनुसार आणि संधी साधून केलं असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली. दरम्यान, संजय राऊत ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. या संदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेल आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<