‘आम्ही कुणाला भेटायचं हे संजय राऊत यांनी सांगायची गरज नाही’

पुणे: आम्ही कुणाला भेटायचं हे संजय राऊत यांनी सांगायची गरज नाही.पण तरीही तमाम जनतेच्या माहितीसाठी म्हणून सांगतो.राज ठाकरे साहेबांनी वेळोवेळी मुख्यमंत्री महोदयांना लोकांच्या बऱ्याच अडचणी फोन करून सांगितल्या आहेत,पण त्यावर जर काहीच कार्यवाही होत नसेल तर मग आम्ही राज्यपालांना भेटलो यात गैर काय ? अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’ सोबत बोलतांना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत हे आज पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित एक कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना असे म्हटले की,“महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे.

यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांना चांगलेच सुनावले आहे. नांदगावकर म्हणाले की या राऊतांनी कधी आंदोलन केली आहेत का? किंवा जनतेत जाऊन यांनी कधी लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत का? अहो यांना काय माहित लोकांच्या काय अडचणी असतात नुसतं उठसुठ बोलायचं काहीतरी.त्यामुळे राऊत यांच्या बोलण्याला आम्ही अजिबात किंमंत देत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान,महामहीम राज्यपालांनी राजभवनात निवांत राहावं, त्यांची नेमणूक केंद्राकडून होत, पण राज्याच्या तिजोरीतून राज्यपालांवर खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या